सोशल मीडियावरील नकारात्मकतेने "मिहान'चा बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर,  ः सोशल मीडियावर "मिहान' प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासीनता यावरच अधिक चर्चा दिसून येते. त्यामुळे "मिहान'बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत असल्याचे चित्र आहे.या नकारात्मक चर्चेला आळा घालण्यासाठी तसेच सोशल मीडियावर या प्रकल्पाचे सकारात्मक पैलू पुढे आणणाऱ्या ई-डेस्कची गरज सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. सोशल मीडियाने यापूर्वीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

नागपूर,  ः सोशल मीडियावर "मिहान' प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासीनता यावरच अधिक चर्चा दिसून येते. त्यामुळे "मिहान'बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत असल्याचे चित्र आहे.या नकारात्मक चर्चेला आळा घालण्यासाठी तसेच सोशल मीडियावर या प्रकल्पाचे सकारात्मक पैलू पुढे आणणाऱ्या ई-डेस्कची गरज सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. सोशल मीडियाने यापूर्वीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. सोशल मीडियावरील एखाद्या प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया, पोस्ट्‌स आदींचा अभ्यास करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून मोठी फौज उभी केली आहे. बहुतांश उद्योजक, गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा निर्णय सोशल मीडियावरील प्रकल्पाची विश्‍वासार्हता तपासूनच होत असतो. दुर्दैवाने मिहानबाबत सोशल मीडियावर नकारात्मक नोंदी आढळत आहेत. विशेष म्हणजे या नकारात्मक नोंदी नागपूरकरांच्याच आहेत, अशी खंत पारसे यांनी व्यक्त केली. त्यामुळे या प्रकल्पाची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याने गुंतवणूकदार मिहानबाबत उदासीन झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. नागपुरात उपलब्ध मनुष्यबळ, कच्चा माल, नैसर्गिक साधने, केंद्रस्थानी असलेले व दळणवळणाच्या पूर्ण सोयी याबाबत सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत नाही. कोणताही गुंतवणूकदार हा "कमीत कमी जोखीम व जास्तीत जास्त नफा' या तत्त्वावर गुंतवणूक करतो. परंतु, मिहानबाबत सोशल मीडियावर "जास्तीत जास्त जोखमी व कमीत कमी नफा' अशी प्रतिमा पुढे येत आहे. मिहानबाबत विकासकारणावर राजकारण भारी पडले असून हीच प्रतिमा जगभरातील गुंतवणूकदारांपुढे आली आहे. मिहान प्रकल्प रोजगाराच्या दृष्टीने शहराचा आत्मा आहे. केवळ मॅरेथॉन, रोड शो करून गुंतवणूकदार येणार नाहीत. सोशल मीडियावर मिहानबाबत 100 टक्के सकारात्मक वातावरणनिर्मिती हा एकमेव पर्याय असल्याचे पारसे यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाची मजबूत पायाभरणी केली असून याचे उत्तम उदाहरण मेट्रो आहे. 11 वर्षे बंगलोर मेट्रो प्रकल्प, 9 वर्षे हैदराबाद मेट्रो प्रकल्प रखडला तर साडेचार वर्षांपासून फरपट चाललेला पुणे मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत अवघ्या 24 महिन्यांत नागपूर मेट्रो सुरू झाली. उभय नेतृत्वाची, त्यांच्या विकासाच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे हास्यास्पद आहे, असल्याची पुश्‍तीही त्यांनी जोडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Mihan" victim of negativity on social media