Republic Day 2020 : लष्कराचे बँडपथक यावर्षीपासून वाजवणार ही धून... ऐकून तुमचेही जागेल देशप्रेम

नीलेश डाखोरे
Wednesday, 22 January 2020

नागपूर : देशात प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कारण, या दिवशी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला म्हणजे भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. भारतीय संविधानानुसारच वागण्याची आपण शपथ घेतली. प्रजासत्ताकदिनाला लाल किल्ला असो किंवा कुठलाही कार्यक्रम वंदे मातरम्‌ हेच गीत वाजविल जाते. मात्र, लष्कराच्या "बिटिंग द रिट्रिट'मध्ये ख्रिश्‍चन गीत "अबाईड विथ मी'ची धून वाजवली जात होती. मात्र, येणाऱ्या प्रजासत्ताकदिनाला "अबाईड विथ मी'च्या ऐवजी "वंदे मातरम्‌' या गीताची धून वाजवली जाणार असल्याची माहिती आहे. 

नागपूर : देशात प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कारण, या दिवशी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला म्हणजे भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. भारतीय संविधानानुसारच वागण्याची आपण शपथ घेतली. प्रजासत्ताकदिनाला लाल किल्ला असो किंवा कुठलाही कार्यक्रम वंदे मातरम्‌ हेच गीत वाजविल जाते. मात्र, लष्कराच्या "बिटिंग द रिट्रिट'मध्ये ख्रिश्‍चन गीत "अबाईड विथ मी'ची धून वाजवली जात होती. मात्र, येणाऱ्या प्रजासत्ताकदिनाला "अबाईड विथ मी'च्या ऐवजी "वंदे मातरम्‌' या गीताची धून वाजवली जाणार असल्याची माहिती आहे. 

आपण दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन का साजरा करतो? हे अनेकांना अजूनही माहीत नाही. त्याचप्रमाणे अगदी कमी लोकांना माहीत आहे की स्कॉटलंडच्या कवीने लिहिलेले ख्रिश्‍चन गीत "अबाईड विथ मी' हे लष्कराच्या "बिटिंग द रिट्रिट'मध्ये परेडदरम्यान वाजवले जाते. कारण, हे गीत महात्मा गांधी यांचे आवडते होते. हे पारंपरिक ख्रिश्‍चन गीत आहे. 

संबंधित इमेज

1950 सालापासून म्हणजे पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून लष्करातर्फे "बिटिंग द रिट्रिट'चे आयोजन करण्यात येत आहे. 26 जानेवारी 1950 ही पहिलीच वेळ होती जेव्हा भारताने "प्रजासत्ताक' बनण्याचा आनंद साजरा केला. प्रजासत्ताक हा असा देश आहे जिथे सर्वोच्च सत्ता एखाद्या राजाच्या हाती नसून लोकांच्या हातात असते. "बिटिंग द रिट्रिट'मध्ये वेगवेगळ्या धून लष्कराच्या बॅंडकडून वाजवल्या जात असतात. यात स्कॉटिक गीतकार हेन्री फ्रान्सिस लाइटचे "अबाईड विथ मी' या गीताचीही धून वाजवली जाते. या गीताला विल्यम हेन्री मॉंक यांनी संगीत दिले आहे. 

काळानुरूप बदल

गेल्या काही वर्षांत पाश्‍चात्त्य धून बरोबर भारतीय पारंपरिक धून समाविष्ट केली जात आहे. कालानुरूप हा बदल केला जात असतो. यंदा "अबाईड विथ मी' या गीताऐवजी वंदे मातरम्‌ या गीताची धून वाजवली जाणार असल्याची माहिती आहे. तसेच आणखी काही नवीन धूनही यात सहभागी केल्याची माहिती आहे. "बिटिंग द रिट्रिट' हा कार्यक्रम दरवर्षी 29 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीतील विजय चौकमध्ये आयोजित केला जातो. हा सोहळा प्रजासत्ताकदिनाची समाप्ती म्हणून ओळखला जातो. याला लष्करामध्ये मोठे महत्त्व आहे.

beating the retreat ceremony band साठी इमेज परिणाम

'अबाईड विथ मी'चा इतिहास

इंग्लंडच्या चर्चचे सभासद असलेले स्कॉटलंडचे हेन्‍री फ्रान्सिस लिट यांनी 1847 मध्ये "अबाईड विथ मी' हे कवण रचले आहे. ही रचना केल्यानंतर तीनच आठवड्यानंतर लिट यांचे निधन झाले. भारतात 1861 मध्ये पहिल्यांदा दिल्लीत ही धून वाजविण्यात आली होती. आजही गणतंत्रदिन साजरा झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 29 जानेवारीला विजय चौक येथे भारतीय सेनादलाचे सामायिक बॅंड पथक "बिटिंग रिट्रीट'साठी या गीताची धून वाजवितात. 

beating the retreat ceremony band साठी इमेज परिणाम

गीत म्हणजे ईश्‍वराला केलेली प्रार्थना

खरे तर "अबाईट विथ मी' ही ईश्‍वराला केलेली प्रार्थना आहे. व्यक्तीच्या जीवनात जेव्हा अंधकार आणि प्रकाशाचे म्हणजेच दुःख आणि आनंदाचे क्षण येतात, अशा दोन्ही परिस्थितीत ईश्‍वर पाठीशी उभा राहावा, अशी प्रार्थना केली आहे. ब्रिटनचे सम्राट जॉर्ज पाचवे यांना हे गीत खूप आवडायचे. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कित्येक प्रसंगी या गीताची धून वाजविली जात असे. महात्मा गांधी यांनी जेव्हा मैसूर संस्थानला भेट दिली होती तेव्हा मैसूर राजवाडा पथकाने हे गाणे वाजविले होते. एवढेच नव्हे तर जेव्हा टायटनिक जहाज सागरतळाशी जात होते तेव्हा जहाजावरील बॅंड पथकाने "अबाईड विद मी' वाजविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: military band is going to play this tune