मिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

मिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले
नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके रुळाखाली घसरले. ही घटना मंगळवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानक परिसरात इटारसी मार्गावरील डी कॅबीनवर घडली. घटनेनंतर ट्रेनची दोन भागांत विभागणी करून रेल्वेमार्ग मोकळा करण्यात आला. यानंतर क्षतिग्रस्त डब्यांच्या चाकांचे दुरुस्तीकार्य युद्धस्तरावर करण्यात आले.

भारतीय सेनेचे साहित्य घेऊन जाणारी ही रेल्वेगाडी लुंबडींग विभागातून विजयवाडा विभागात जात होती. ही गाडी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास गोधनीकडून नागपूर स्थानकाच्या दिशेने येत होती. डायमंड क्रॉसींगजवळ डी केबीनजवळून जात असताना या गाडीचे इंजिनपासून 19 व 20 क्रमांकाच्या ट्रॉली वॅगन रुळावरून घसरल्या. घटनेची माहिती दुपारी 1.25 वाजता संबंधित विभागाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. मुख्य मार्गावरच ही घटना घडल्याने दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांवर परिणाम होण्याची शक्‍यता लक्षात घेत अपघात ग्रस्त गाडीच हटवून मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही गाडी दोन भागांत विभागण्यात आली.
प्रारंभी समोरच्या भागातील काही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करून फलाट क्रमांक 2 लगतच्या लुप लाइनवर आणण्यात आले. तत्पश्‍चात क्षतिग्रस्त दोन्ही ट्रॅलीसह उर्वरित ट्रॉली वॅगन व डबे गुड्‌स यार्डात आणून दुरुस्तीकार्य हाती घेण्यात आले. दुपारी 3.48 पर्यंत दुरुस्तीकार्य करण्यात आले. यानंतरही या गाडीचे दोन्ही भाग रेल्वेस्थानकावरच थांबून होते. वेळीच योग्य खबरदारी घेण्यात आल्याने रेल्वे वाहतूक फारशी विस्कळीत झाली नाही. मात्र, पुरी-गांधीधाम एसएफ एक्‍स्प्रेस, शालीमार एक्‍स्प्रेससह अन्य काही गाड्या काहीवेळ नियंत्रित कराव्या लागल्या. चौकशीनंतरच घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

Web Title: The military special train collapses from the tracks