दूध आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम

निलेश बढे
गुरुवार, 19 जुलै 2018

कोथळी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही मोताळा तालुक्यात पाहायला मिळाली. मोताळा तालुक्यातील वरुड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चंदुभाऊ गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आपले दूध रस्तावर ओतून शासनाच्या निषेध करत दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगत सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी करत, दुधाचे भाव वाढेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेंद्र जाधव, राजू शिंदे, उमेश राजगुरे, यांच्या सह श्याम जुणारे, प्रमोद जुणारे,गाजीधर पाटील,प्रमोद घनोकार, शिवानंद नारखेडे, मोहन भोपडे, महेश भारबे,संतोष मामालकर, अर्जुन जुणारे, 
बळीराम गरुडे,भागवत बोंबटकर,यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
 
Web Title: milk agitation continue on 3rd day