शालेय पोषण आहारात आता 'दूध भुकटी'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दूध भूकटीपासून तयार केलेले दूध देण्यासाठी एका विद्यार्थ्यासाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी २०० ग्रॅम दूध भुकटीचे एक पाकीट असे तीन महिन्यासाठी एकूण ६०० ग्रॅमचे ३ पाकीट विद्यार्थ्यांना घरी देण्यात येतील.सदर दूध भुकटीमधून पालकांनी त्याच्या पाल्याना दूध भुकटीपासून घरी दूध बनवून देणे अपेक्षित आहे.

नांदुरा (बुलडाणा) : राज्यात सद्या निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भुकटीच्या संदर्भात शासन स्तरावरून करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत  शासनाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनामध्ये राज्यात विविध विभागामार्फत सुरू असलेल्या पोषण आहारामध्ये दूध अथवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे नमूद केले होते.सदर निर्णयाची अंमलबजावणीसाठी मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत कर्नाटक राज्यातील "क्षीर भाग्य योजने"चा अभ्यास करून शालेय पोषण आहार योजनेतील लाभार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेत पूरक आहार म्हणून दूध भुकटी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दूध भूकटीपासून तयार केलेले दूध देण्यासाठी एका विद्यार्थ्यासाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी २०० ग्रॅम दूध भुकटीचे एक पाकीट असे तीन महिन्यासाठी एकूण ६०० ग्रॅमचे ३ पाकीट विद्यार्थ्यांना घरी देण्यात येतील.सदर दूध भुकटीमधून पालकांनी त्याच्या पाल्याना दूध भुकटीपासून घरी दूध बनवून देणे अपेक्षित आहे. सदर दूध भुकटीचे वाटप एकाच दिवशी करण्यासाठी संबंधित शाळेने 'दूध भुकटी वाटप दिवस'जाहीर करून शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत संबंधित विद्यार्थ्यांना दूध भुकटीचे ३ पाकीट देण्यात यावीत.राज्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांना दूध भूकटीपासून दूध कसे तयार करावयाचे याबाबत सविस्तर सूचना दूध भुकटी वाटप दिवशी देण्यात याव्या.

सदर योजना ३ महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून योजनेअंतर्गत पुरविण्यात येणारी दूध भुकटी  महाराष्ट्र राज्यात उत्पादित केली असावी असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: milk powder in schools