दुध विक्रेत्याची हत्या

अनिल कांबळे
मंगळवार, 26 जून 2018

नागपूर - कोराडी ठाण्यांतर्गत मसाळा गावात एका दुध विक्रेत्याला शेजाऱ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. मंगेश आबाजी भोयर (35) असे मृताचे नाव आहे. मंगेशचा दुधाचा व्यवसाय होता. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या कारोकर कुटुंबातील 2 सदस्यांना कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

माहिती मिळाली आहे की मंगेश आपली जनावरे कारोकार यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत बांधत होता. कारोकार कुटुंबानुसार ती जागा त्यांची आहे, तर मंगेशचे म्हणणे होते की जमीन ग्राम पंचायतची आहे. घाण होत असल्याने कारोकर कुटुंबियांनी अनेकदा त्याला तेथे गाय-म्हशी बांधण्यास विरोध केला होता. यावरून त्यांच्या अनेकदा भांडणही झाले. सोमवारी दुपारी पुन्हा या कारणातून त्यांच्यात भांडण उद्भवले. कारोकार कुटुंबियांनी मंगेशवर हल्ला चढवला. काठीने त्याला जबर मारहाण करण्यात आली. मंगेशचे कुटुंबिय गंभीर स्थितीत त्याला उपचारार्थ जरीपटका परिसरातील मदन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रात्री 9 च्या सुमारास उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू झाला. कोराडीचे वपोनि गणेश ठाकरे यांनी सांगितले की भांडणानंतर कुटुंबियांनी मंगेशला रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

Web Title: Milk seller's murder in nagpur