दुधाचा टॅंकर फोडून लावली आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

वरुड (अमरावती), ः दुधाला पाच रुपये भाव जास्तीचे मिळावे व तालुक्‍यात मदर डेअरी सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा जि. प. सदस्य देवेंद्र भुयार यांनी दुपारी दोनला मध्य प्रदेशातून येणारा दुधाचा टॅंकर परतवाडामार्गे वरुड रस्त्यावरील नागझिरीजवळ अडवून सुरवातीला फोडण्यात आला व नंतर त्याला आग लावण्यात आली. यामुळे घटनास्थळावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे दुधाच्या वाढीव भावासाठी आग्रही होते. दुधाला वाढीव भाव मिळाला नाही, तर कुठल्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासनाला दिला होता. त्याचे पडसाद वरुड तालुक्‍यात उमटले असून मध्य प्रदेशातून परतवाड्यामार्गे वरुडला येणारा दुधाचा टॅंकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी फोडला. यामुळे घटनास्थळावर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
काही वेळानंतर आंदोलनकर्ते घटनास्थळावरून निघून गेले, त्यानंतर चालकाने टॅंकर विझविण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे दुधाच्या टॅंकरचे फारसे नुकसान झाले नाही. टॅंकरचालक कैलास हरिभाऊ चंदेल (वय 36, रा. कळमेश्वर) यांनी बेनोडा पोलिस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली. पुढील तपास बेनोडा शहीद पोलिस करीत आहेत.

Web Title: milk tankar targetede by swabhimani activist