पुरात वाहून गेला दुधाचा टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

रावणवाडी (जि. गोंदिया) : दुथडी भरून वाहत असलेल्या पांगोली नदीवरील पुलावरून जाताना दुधाच्या टॅंकरसह चालक वाहून गेला. ही घटना मंगळवारी (ता. 17) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावरील सोनारी घाटाजवळ आज, बुधवारी दुपारी दुधाचा टॅंकर आढळून आला. मात्र, चालक अजूनही बेपत्ता आहे. पाणबुडे आणि आपत्‌कालीन मदत पथकाकडून शोध घेणे सुरू आहे. जिल्हा आणि तालुका प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी मध्य प्रदेशातील बालाघाट येथून दूध संकलन करून रावणवाडी-कामठामार्गे चालक गौतम संतोष पाटील (रा. माणिकवाडा, ता. नरखेड, जि. नागपूर) हा टॅंकर (एमएच 16-सीसी 0392) घेऊन पांजरा येथील पांगोली नदीचा पूल ओलांडत होता. परंतु, पुलावरून पाणी वाहत असल्याने टॅंकरसह चालक गौतम पाटील वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळ गाठले. अंधार आणि पांगोली नदीचा जलस्तर वाढल्याने मंगळवारी रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. आज, बुधवारी सकाळी सातपासून पाणबुडे व नाव यांच्या मदतीने मदत पथकाने शोधकार्य सुरू केले. दुपारी सोनारीघाट येथे दुधाचा टॅंकर आढळून आला. मात्र, चालक बेपत्ता आहे. मध्य प्रदेश येथून आमगाव येथे पाच हजार लिटर दूध घेऊन हा टॅंकर जात होता, अशी माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार भंडारे, रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर, नायब तहसीलदार अशोक कोरे, मंडळ अधिकारी वंदना डोंगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व पोलिस विभागाची चमू तसेच पाणबुडे बेपत्ता चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: Milk tanker drown in flood