तुला ना मला घाल कुत्र्याला, दूध दर आंदोलन

निलेश बढे
सोमवार, 16 जुलै 2018

कोथळी (बुलडाणा) : स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंदला सकारात्मक प्रतिसाद देत येथील शेतकऱ्यांनी आपले दूध कुत्र्यांना पाजत अभिनवं पद्धतीने शासनाच्या दूध धोरणाचा निषेध केला. 

कोथळी (बुलडाणा) : स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंदला सकारात्मक प्रतिसाद देत येथील शेतकऱ्यांनी आपले दूध कुत्र्यांना पाजत अभिनवं पद्धतीने शासनाच्या दूध धोरणाचा निषेध केला. 

येथील अनेक शेतकऱ्यांनी व बेरोजगार युवकांनी दूध व्यवसाय स्वीकारत त्यामध्ये चांगला जम बसविला आहे मात्र मागील काही महिन्यांपासून सातत्याने कमी होणाऱ्या दुधाच्या भावाने हा व्यवसाय त्यांना परवडत नसल्याची भावना निर्माण झाली  आहे. यासाठी दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान मिळावे व अनुदानाची रक्कम दूध संघांना न देता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी  यासाठी राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध बंद आंदोलन छेडण्यात आले आहे त्याला उस्फूरता प्रतिसाद  याठिकाणी देण्यात आला. शासनाचा निषेध म्हणून येथील शेतकऱ्यांनी आपले दूध कुत्र्यांना पाजले.

यावेळी विठ्ठल पाटील, योगेश मोतळकर, विष्णू पाटील, मोहन पाटील, अमोल पाटील, शुभम पाटील, संतोष घाटे, जनार्दन भुसारी, चेतन पाटील, यासीन शाह, हनिफ शाह यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: milkagitation milk give to dog