"करोडपती' बबिता ताडे जिल्हा परिषदेच्या "ब्रॅण्ड ऍम्बेसिडर'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

अमरावती : कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटवरून एक कोटींची रक्कम जिंकून अमरावती जिल्ह्याचा नावलैकिकात भर पाडणाऱ्या अंजनगावसुर्जी येथील बबिता ताडे आता मतदान जनजागृती करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने बबिता ताडे यांना ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मंगळवारी (ता. एक) ही घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदार जनजागृतीचा कार्यक्रम स्विप समितीच्या माध्यमातून शासनाकडून हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांची स्विप समितीच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावती : कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटवरून एक कोटींची रक्कम जिंकून अमरावती जिल्ह्याचा नावलैकिकात भर पाडणाऱ्या अंजनगावसुर्जी येथील बबिता ताडे आता मतदान जनजागृती करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने बबिता ताडे यांना ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मंगळवारी (ता. एक) ही घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदार जनजागृतीचा कार्यक्रम स्विप समितीच्या माध्यमातून शासनाकडून हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांची स्विप समितीच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी प्रामुख्याने नवमतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 2 ऑक्‍टोबरला ग्रामपंचायतस्तरावरील सर्व मतदारकेंद्रांवर ग्रामसभेच्या माध्यमातून चुनाव पाठशाला हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये गावात फेरी काढून मतदारांना प्रोत्साहित केले जाईल. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांसाठी संकल्प पत्र भरून घेतले जात आहे. तसेच चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींचेही आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून कोन बनेगा करोडपतीच्या विजेत्या बबिता सुभाष ताडे यांची ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी मनपा आयुक्त संजय निपाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, बांधकाम विभागाचे कार्यकारी प्रशांत गावंडे, मुख्य लेखाधिकारी रवींद्र येवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, ज्ञानेश्‍वर घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Millionaire" Brand Ambassador of Babita Tade Zilla Parishad