लाखो भाविकांची आज राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या क्रांतदर्शी महापुरुषाला उद्या, शनिवारी (ता. 19) दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी भावपूर्ण मौनश्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी गुरुकुंजात भरलेली मोठी यात्रा दोन मिनिटांसाठी स्तब्ध राहील. जो जेथे असेल तेथेच थांबून राष्ट्रसंतांना आपली आदरांजली वाहणार आहे. या निमित्ताने योगगुरू रामदेवबाबा व ध्यानगुरू डॉ. कमलेश पटेल मोझरीत दाखल होत आहेत.

राष्ट्रसंतांच्या 51 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त देशभरातील साधू-संत, विद्वान, प्रचारक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि भाविक भक्त व परदेशी नागरिकसुद्धा या महोत्सवात हजेरी लावणार आहेत. तसेच योगगुरू स्वामी रामदेवबाबा व शांतीवनम हैदराबाद येथील हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. कमलेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
19 ऑक्‍टोबरला राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या समाधिस्थळी हा सोहळा होईल. "मौन श्रद्धांजलीचा' दिवस सर्वसंत स्मृती "मानवता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल. याप्रसंगी राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे जीवनकार्य आणि विचार लाखो भाविकांना भजन व निवेदनाद्वारे समजावून सांगण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of devotee today pay tributed to the rashtrasant tukdoji maharaj

टॅग्स