मिनी ट्रक उलटल्याने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

भद्रावती (जि. चंद्रपूर) : वणी येथे विटा टाकून परत येत असलेल्या मिनी ट्रकला झालेल्या अपघातात एकाचा जागीच तर दुसऱ्याचा दवाखान्यात मृत्यू झाला. या अपघातातील चार जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना आज (ता. 4) 3.30 वाजताच्या दरम्यान येथील डॉली पेट्रोल पंपाजवळ घडली.

शहरातील खापरी येथील वैभव कुत्तरमारे यांच्या मालकीच्या मिनी ट्रकने वणी येथे विटा पाठविल्या होत्या. परत येत असताना शहराजवळील डॉली पेट्रोलपंपाजवळ अचानक कुत्रा समोर आला. चालक अजयने जोरदार ब्रेक मारला. यामुळे मिनी ट्रक उलटला. यात विजय जांभुळे (वय 31) हा मजूर जागीच ठार झाला तर घनश्‍याम गजबे (वय 40) याचा दवाखान्यात मृत्यू झाला. जखमींपैकी वासुदेव काशिनाथ चिकटे (वय 35), भारत कचरू जिवतोडे (वय 30), अनिल वामन खोब्रागडे (वय 41) आणि मंगेश झाडे या चार मजुरांवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक व जखमी भद्रावती शहरातील फुकटनगर (हनुमाननगर) येथील रहिवासी आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mini truck overturn; Two persons dead