आजपासून लघुचित्रपट महोत्सव

file photo
file photo

आर्वी (जि. वर्धा : दंडार फडाकरिता प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांचे लक्ष चित्रपट सृष्टीकडे वळविण्याकरिता येथील मल्हार फिल्म आर्ट कंपनीने विदर्भाच्या इतिहासातील पहिल्याच लघुचित्रपट महोत्सव-2019 चे आयोजन केले आहे.
येथील साई कृपा हॉलमध्ये शनिवार (ता. 17) व रविवार (ता. 18)पर्यंत चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात विदर्भातील 130 लघुचित्रपट दाखविले जाणार आहेत. यातील तीन चित्रपटांची निवड करण्यात येणार आहे.
रविवारी (ता. 17) या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार अमर काळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाराव केचे राहतील. नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, तबलावादक प्रशांत गायकवाड, राज कुबेर, वर्षा देशमुख, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. रविवारी (ता. 18) या महोत्सवाचा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे राहतील.
"नाळ' चित्रपटात चैत्याची भूमिका साकारणारा श्रीवास पोकळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विदर्भप्रमुख समन्वयक राज कुंबर, विदर्भ समन्वयक रूपाली कोंडेवार, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, आर्वीचा सुपुत्र व गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले गायक सुनील वाघमारे, जगातील सर्वांत कमी उंचीची महिला ज्योती आमगे, स्मरणशक्तीच्या क्षेत्रात विश्‍वविक्रम करणारी गौरी कोढे, "वऱ्हाडी झटका'फेम रमेश ठाकरे, महाक्रांती चित्रपट सेनेचे सचिव रमेश पवार हे या कार्यक्रमाचे आकर्षण आहेत.
याप्रसंगी डॉ. विकास आमटे, श्रीनिवास पोकळे, ज्योती आमगे, सुनील वाघमारे, गौरी कोढे, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, डॉ. अरुण पावडे, रमेशचंद्र राठी, पत्रकार पराग ढोबळे, दशरथ जाधव, समाजसेवक गौरव जाजू, परेश जाटवे, स्वप्नील शेळके, नितीन गवळी, अनिश चोरडिया यांचा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केल्याबद्दल विदर्भरत्न पदवी देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी .
या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मल्हार फिल्म आर्टचे संस्थापक तसेच आयोजक अक्षय अहीव, अतुल कुडवे, अमित अहीव, गणेश गायकवाड आणि सहकाऱ्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com