भामरागड तालुक्याला पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; पूरग्रस्त भागाची केली पाहणी 

मिलिंद उमरे 
Tuesday, 1 September 2020

पुरपीडित लोकांना जीवनाशक वस्तूचे 128 किट चे वाटप केले व तालुक्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत उर्वरीत किट शासकीय यंत्रने द्वारे पोहचविण्यात येतील असे पालकमंत्रीनी सांगितले.

भामरागड (जि. गडचिरोली) : -महाराष्ट्राचे नगर विकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री ना एकनाथ शिंदे हे भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असून या दरम्यान  तहसील कार्यालयाला भेट दिली व मागील महिन्यांत भामरागडच्या पूरपरिस्थिती वर  प्रत्येक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करून व  व्हिडिओ व फोटो यांची संकलित माहिती प्रोजेक्टर द्वारे  दाखविण्यात आली. 

हेही वाचा - तुकाराम मुंढे आतापर्यंत गप्प का होते? असा प्रश्न विचारत गाठले पोलिस स्टेशन

तसेच पुरपीडित लोकांना जीवनाशक वस्तूचे 128 किट चे वाटप केले व तालुक्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत उर्वरीत किट शासकीय यंत्रने द्वारे पोहचविण्यात येतील असे पालकमंत्रीनी सांगितले. त्रिवेणी व्यापारी संघटना तर्फे समस्याचे निवेदन स्वीकारले त्यानंतर पर्लकोटा नदीवर ऊभे राहुन पुलाची निरिक्षण केले व लवकरच नविन पुलांच्या बांधकामाला सुरुवात होणार यांची माहीती दिली.

जिल्हा अधिकारी यांच्याशी सवांद साधत या तालुक्याला तीन तीन नद्यांच्या वारसा लाभले असून येथिल शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी त्याकरिता उपसा जलसिंचन (lifterication) प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाला पाठवा असे निर्देश पालकमंत्रीनी जिल्ह्याअधीकार्याला दिले. व तसेच भामरागड नगरपंचायत करीता पुरेशा निधी देण्यात येईल असे सांगण्यात आले. 

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

यावेळी जिल्हाअधीकारी दिपक सिंगला,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक अजय बन्सल उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मनुज जिंदल उपविभागीय अधिकारी गडचिरोलीचे आशिष येरेवार भामरागड चे तहसीलदार सत्यानारायण सिलमवार उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ कुणाल सोनवणे,नायब तहसिलदार प्रकाश पुप्पूलवार नायब तहसीलदार अनमोल कांबळे  नगरपंचायतचे मुख्याअधिकारी डॉ सुरज जाधव  भामरागड चे पोलीस निरीक्षक संदीप भांड उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Eknath Shinde visited flood affected area in gadchiroli