अपहरणानंतर अल्पवयीन मुलीसोबत निर्जनस्थळी अश्लील चाळे

atyachar
atyacharatyachar

अमरावती : अल्पवयीन मुलीचे (Minor girl) फ्रेजरपुरा हद्दीतून अपहरण करून नांदगावपेठमध्ये निर्जनस्थळी नेले. तिने झुडूपात येण्यास नकार दिला. त्यामुळे युवकाने कमरेच्या पट्ट्याने तेथेच जबर मारहाण केल्याची घटना घडली. युवतीचे अपहरण आणि तिच्याशी अश्लील वर्तन (atrocity), मारहाण करणारे संशयित युवक हे अकोला येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजय व नितीन अशी दोघा संशयित युवकांची नावे आहेत.

संपूर्ण नाव सध्यातरी उपलब्ध झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी विनयभंग, मारहाण, अपहरण, ठार मारण्याची धमकी देण्यासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. शहरातील एका अल्पवयीन मुलीची मैत्रिणीच्या माध्यमातून अकोला येथील संशयित अजय सोबत ओळख झाली होती. त्यानंतर फोनवर बोलणे आणि त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

atyachar
Rest in peace : त्याने स्वतःलाच वाहिली श्रद्धांजली; आत्महत्येचा संशय

अजयने अल्पवयीन मैत्रिणीला भेटीसाठी बोलविले. तो त्याचा मित्र नितीन याच्यासोबत दुचाकीने अमरावतीत आला. जेलक्वॉर्टर परिसरातून तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून नांदगावपेठजवळ निर्जनस्थळी नेले. संशयित अजयने बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील चाळे (atrocity) केले. त्यानंतर शेजारीच झाडाझुडूपात सोबत चालण्याचा आग्रह अजयने पीडितेला धरला. तिने त्यासाठी नकार दिला.

नकारामुळे चिडलेल्या अजयने कमरेचा पट्टा काढून अल्पवयीन मुलीस बेदम मारहाण (Beaten with a belt) करून जखमी केले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही दोघांनी दिली, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला. या प्रकरणी पोलिसांनी अजयविरुद्ध विनयभंग, पोस्को तर अपहरणात त्याला मदत करणारा मित्र नितीनविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला.

atyachar
उभा ट्रेलर पाहून चालक घाबरला अन् तागडे कुटुंबाला मृत्यूने कवटाळले

रागात तिचा मोबाईल फोडला

अल्पवयीन मैत्रिणीने जास्त जवळीक साधण्यास नकार दिल्यामुळे अजयने तिच्या जवळचा मोबाईल हिसकून फोडून पाच हजारांचे नुकसान केले, असा आरोपही पीडितेने तक्रारीत केला.

पीडितेने याप्रकरणात सहभागी अकोला येथील दोघा पसार युवकांची पूर्ण नावे आणि पत्ता माहिती नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस त्या युवकांच्या मागावर आहेत.
- अनिल कुरळकर, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com