अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

वणी (जि. यवतमाळ) : मारेगाव येथील मुलींच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या किनवट येथील अल्पवयीन मुलीवर वणी येथील चार तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना चाइल्ड हेल्पलाइन यवतमाळच्या पथकाने उघडकीस आणली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, फरार असलेल्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

किनवट तालुक्‍यातील अल्पवयीन मुलगी शिक्षण घेण्यासाठी मारेगाव येथील मुलींच्या वसतिगृहात राहते. कामानिमित्ताने ती नियमित वणी येथे यायची. बसस्थानक परिसरातून तिला वणी येथील चार तरुण दुचाकीने निर्जनस्थळी घेऊन जायचे व तिच्यावर अत्याचार करायचे. वारंवार हे कृत्य सुरू असल्याची माहिती यवतमाळ येथील हेल्पलाइनला मिळाली. पथकाचे दिलीप दाभोडकर व अपर्णा गुर्जर यांनी शनिवारी (ता. 20) वणी गाठले. त्या मुलीचा शोध घेऊन विश्‍वासात घेऊन माहिती काढली. पीडितेने घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तत्काळ वणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पंचनामा केला. अत्याचार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक हे या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत. पीडितेचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl gang raped