अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - अंगणात खेळत असलेल्या तेरा वर्षीय मुलीला आरीचा धाक दाखवून अस्सकुमार यादव (३२, रा. जरीपटका) याने बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जरीपटक्‍यात घडली.

नागपूर - अंगणात खेळत असलेल्या तेरा वर्षीय मुलीला आरीचा धाक दाखवून अस्सकुमार यादव (३२, रा. जरीपटका) याने बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जरीपटक्‍यात घडली.

अल्पवयीन मुलगी निशाचे (बदलले नाव) आईवडील मूळचे मध्य प्रदेशातील छपारा येथील आहेत. ते कामाच्या शोधात कुटुंबासह नागपुरात आले. जरीपटक्‍यात त्यांनी भाड्याने खोली घेतली. निशाला दोन बहिणी व भाऊ आहे. शुक्रवारी दुपारी आईवडील कामाला निघून गेले. निशा भावंडांसह अंगणात खेळत होती. यादव तेथे आला व निशाचे तोंड दाबून घरात नेले. घरातील आरी निशाच्या गळ्याला लावली व ओरडल्यास ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला. अंगणात खेळत असलेल्या भावंडांनी आरडाओरड करीत वस्तीतील नागरिकांना बोलावून आणले. शेजारी मदतीला धावले असता यादव पळून गेला. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस मध्य प्रदेशात
आरोपी अस्सकुमार यादव याला शेजारी राहणाऱ्या महिलांनी पकडून ठेवले. १०० क्रमांकावरून फोन करून पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो महिलांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. यादव मध्य प्रदेशातील शिवनी गावचा आहे. पोलिस पथक मध्य प्रदेशला रवाना झाले आहे.

Web Title: Minor girl rape case in nagpur