राजस्थानात पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अमरावती : लग्नाच्या मोबदल्यात पैशाचे आमिष देऊन राजस्थानात पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 12 व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.

अमरावती : लग्नाच्या मोबदल्यात पैशाचे आमिष देऊन राजस्थानात पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 12 व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.
प्रशांत राजेंद्र सदाशिवे, राजेंद्र सदाशिवे (रा. चवरेनगर, अमरावती), ईश्वर चौधरी (कानोला हरदोळा, दर्यापूर), भूपेंद्र चौधरी, ओमविट चौधरी, कल्याण, लोकेश विद्वान कुंथल, मनोज कुंथल (गांगुर्ली, राजस्थान) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 10 जून पासूनचा हा घटनाक्रम आहे. मुलीला राजस्थानात नेल्यानंतर लोकेश कुंथलचा जावई व लोकेशच्या मोठ्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या महिला तसेच आई-वडील, मामा यांनी सुटका करून आल्यानंतर तिने लोहारा (जि. यवतमाळ) ठाण्यात तक्रार दिली. घटनेची सुरुवात अमरावती येथून झाल्याने संबंधित प्रकरण (अमरावती) पोलिसांकडे देण्यात आले. पोलिसांनी अपहरण, लैंगिक अत्याचार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor girl tortured in Rajasthan