Vidhan Sabha 2019 प्रचारकाळातच अकोल्यात युतीमध्ये धुसफूस

File photo
File photo

अकोला : भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम आणि इतर मित्र पक्षांच्या महायुतीमध्ये अकोला जिल्ह्यात धुसफूस दिसून येत आहे. ऐन प्रचार काळातच ही धुसफूस सुरू असून, भाजपकडून इतर मित्र पक्षांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे दिसून येते. अकोला पश्‍चिमसह भाजप उमेदवार असलेल्या काही मतदारसंघात तर प्रचार साहित्यावरून शिवसेनेच्या नेत्यांचे छायाचित्रही गायब झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांनी मित्र पक्षांसोबत महायुती केली. मात्र, या महायुतीत भाजपचेच वर्चस्व अधिक आहे. अकोला जिल्ह्यात तर पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार भाजप आणि एक शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे रासप, शिवसंग्राम आणि आरपीआय (आठवले) गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सैरभैर झाले. जागा वाटपात जिल्ह्यात मित्र पक्षांना डावलण्यात आल्याने ही नाराजी कायम होती. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र नंतर नाराजीचा जोर ओसरला असे वाटत असतानाच भाजपकडून मित्र पक्षांना गृहित धरले जात असल्याने युतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येत आहे. अकोला पश्‍चिममध्ये भाजप उमेदवाच्या प्रचार साहित्यावरून मित्रपक्ष गायब आहेत.
प्रचार फलकावर तर केवळ भाजपच्या नेत्यांचेच छायाचित्र आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र नसल्याने भाजपकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीबाबत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. विविध सोशल माध्यमांवर शिवसैनिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. आधीच जिल्ह्यात जागा वाटपात न्याय न झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये रुजली आहे. त्यात शिवसेनेच्या एकमेव उमेदवाराच्या प्रचारासाठीही भाजपचे पदाधिकारी फिरताना दिसत नाही. त्यातच भाजपच्या उमेदवारांकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे शिवसैनिकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
...............
शिवसैनिक प्रचारातून गायब
भाजपचे उमेदवार असलेल्या चार मतदारसंघात शिवसैनिक प्रचारात अभावानेच दिसत आहेत. भाजपचे उमेदवार किंवा त्याचे काम पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून विचारणा होत नसल्याने बहुतांश ठिकाणी भाजपच्या प्रचारातून शिवसैनिक गायब झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com