स्वत:ला संधी तर द्या, यश तुमचेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नागपूर - जय, पराजयाची चिंता आणि मनातील भीती सोडून द्या. पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची स्वत:ला संधी द्या, यश निश्‍चितच मिळेल, असा विश्‍वास डेलीवूड मिसेस इंडियाच्या विजेत्या अम्रिता पाघडाल यांनी व्यक्त केला. 

अम्रिता पाघडाल यांनी आज ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी स्पर्धेत सहभागासह विजेतेपदापर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली. १९ जुलै रोजी दिल्लीत पार पडलेल्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये अभिनेता अरबाज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेतेपदावर त्यांचे नाव कोरले गेले. याच स्पर्धेत बेस्ट स्माईल आणि बेस्ट टॅलेन्टेड हे दोन खिताबही त्यांनी पटकावले. 

मूळच्या गुजरातच्या असलेल्या अम्रिता विवाहानंतर नागपुरात स्थायिक झाल्या आहेत. नागपुरातही दोन वर्षांपासून शिक्षिका म्हणूनही कार्यरत आहेत. अम्रिता म्हणाल्या, की मैत्रिणीकडून इन्स्पिरेशन मिळाले. जॉब, कुटुंब, स्पर्धेची तयारी हे सर्व सांभाळणे कठीण गेले खरे, पण निश्‍चयामुळे सर्व शक्‍य झाले. टॅलेंट राउंडमध्ये मायकल जॅक्‍सनच्या गाण्यावर नृत्य सादर केले. हेच वेगळेपण परीक्षकांनाही आवडले. भविष्यातील वाटचालीबाबत अद्याप काही ठरविले नाही. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना निश्‍चितच मार्गदर्शन करील’. नागपूरच्या पाच जणी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या ऑडिशनमध्ये त्यांच्यासह ५ जणींची निवड देशभरातील १२६ स्पर्धकांमधून  फिनालेसाठी झाली. विजयाच्या निश्‍चयाने दोन महिने त्यांनी परिश्रम  घेतले. पती, सासू, सासऱ्यांच्या मदतीमुळेच हे यश गाठता आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: misses india amrita paghdhal