कोंडवाडे झाले इतिहासजमा, आता जनावरे रस्त्यावरच;गुमगावमध्ये मोकाट जनावरांमुळो अपघाताचा धोका वाढला

कोंडवाडे झाले इतिहासजमा, आता जनावरे रस्त्यावरच;गुमगावमध्ये मोकाट जनावरांमुळो अपघाताचा धोका वाढला

गुमगाव, (जि. नागपूर) :  गावातील भटक्‍या आणि बेवारस जनावरांसाठी असलेला कोंडवाडा आता जवळपास इतिहासजमा झाला असल्याचे चित्र आहे. यामुळे रस्त्यावर उभी राहणाऱ्या जनवारांच्या उपद्रवांमुळे वाहनधारक, शाळकरी मुले तसेच महिला व पादचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. गुमगावमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

गुमगावच्या गांधी चौक परिसरात गावात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. मोकाट जनावरांच्या वावराला कोणाचा धरबंध आहे की नाही, असा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा आहे. गावातील कोणत्याही रस्त्याने जा, तिथे मोकाट जनावरे उभी नसतील तरच नवल! अशी परिस्थिती सध्या अनुभवास येत आहे. गावात मोकाट जनावरांची दिवसेंदिवस वाढती संख्या शेतकरी, वाहनधारक व शाळकरी मुलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

जनावरे  दिवसभर मोकाट
गावातील आयुर्वेदिक दवाखाना, आठवडी बाजार, बसस्थानक चौक, जिल्हा परिषद शाळा परिसर, गांधी चौक यांसारख्या मुख्य मार्गांवर रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरांचा मुक्तसंचार आढळतो. बहुतांश गोपालक आपल्या जनावरांना दिवसभर मोकाट सोडून देतात. परिणामी नागरिकांच्या घरासमोरील झाडे ही जनावरे खाऊन टाकतात. आठवडी बाजाराला आलेल्या शेतकऱ्यांनाही या मोकाट जनावरांपासून विक्रीस आणलेला माल वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com