विद्यापीठाच्या स्वास्थ्य केंद्रातील डॉक्‍टर बेपत्ता 

file Photo
file Photo

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत. 
           विद्यापीठाच्या स्वास्थ्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची वारंगल येथील राष्ट्रीय संस्थेत वरिष्ठ अधिकारी पदावर प्रतिनियुक्ती झाली आहे. तेव्हापासून हे स्वास्थ्य केंद्र वाऱ्यावर आहे. मार्च महिन्यातील सिनेट सदस्यांनी आरोग्य केंद्राचा प्रश्‍न उचलून धरला. विद्यापीठाने लाखोंचा खर्च करून स्वास्थ्य केंद्रासाठी वैद्यकीय उपकरणे मागवली. मात्र, डॉक्‍टर नसल्याने त्याचा फायदा कुणालाही होत नसल्याचे यावेळी सिनेट सदस्यांनी कुलगुरूंच्या निदर्शनात आणून दिले. त्यानंतर कुलगुरूंनी विशेष समिती नेमून आरोग्य केंद्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, मार्च महिन्यात गठित झालेल्या या समितीची सात महिन्यांत एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला आरोग्य केंद्राचे काहीही गांभीर्यच नसल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून होत आहे. 
व्यवस्थापन परिषदेत हा विषयावर चर्चा झालेली आहे. त्यानुसार लवकरच नवीन डॉक्‍टरची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही एका डॉक्‍टरला पाठविण्यात आला आहे. 
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com