नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन आई बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आंबोली ( चंद्रपूर) : आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन त्याची आई पुयारदंड या गावातून तीन ऑगस्टपासून बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे मुलासह आई बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी भिसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

आंबोली ( चंद्रपूर) : आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन त्याची आई पुयारदंड या गावातून तीन ऑगस्टपासून बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे मुलासह आई बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी भिसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
पुयारदंड येथील वामन मडावी राहतात. सोबत पत्नी कौशल्या, मुलगा राजू , लहान मुलगा हिमांशू राहतात. तीन ऑगस्ट रोजी कौशल्या भिसी येथे बाजारात जातो, असे सांगून लहान मुलगा हिमांशूला घेऊन निघाली. घरून जाताना तिने काही पैसे घेतले. दुपारी बारा वाजता दोघेही बाजारासाठी निघाले. मात्र, रात्री आठ-नऊ वाजले तरी घरी परतले नाही. त्यामुळे पती वामन, मुलगा राजू याने शोधाशोध केली. मात्र, दोघांचाही काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे कौशल्याच्या माहेरी, नातेवाईकांकडेही विचारणा केली. त्याचाही काहीच फायदा झाला नाही. या अगोदरही ती न सांगता मुलाला घेऊन माहेरी निघून गेली होती. मात्र, दोन महिन्यांनी परत आली होती. शेवटी वामन मडावी याने पोलिस स्टेशन गाठून पत्नी, मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. कौशल्याने स्वतःचे आणि मुलाचे काही कागदपत्रे सोबत नेले आहेत.
कौशल्या आणि वामन काही दिवसांपूर्वी ओसस या कंपनीत कामावर होते. दोघांच्याही पगाराचे पैसे कौशल्याच्या खात्यावर जमा होत होते तिच्या खात्यावर असलेले 20-30 हजार रुपये, घरी असलेले पाच हजार रुपये घेऊन तीन तीन ऑगस्टपासून बेपत्ता आहे. पती वामनने कंपनीतही विचारणा केली. मात्र, त्याचाही काहीच पत्ता लागला नाही.
कुटुंबीय चिंतेत
आज आठ दिवस लोटून गेले तरी कौशल्या, मुलगा हिमांशू याचा काहीच पत्ता लागला नाही. पोलिस दोघांचाही शोध घेत आहेत. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने मडावी कुटुंबीय चिंतेत आहेत. दोघांचेही काही बरेवाईट झाले तर नसावे याची चिंता वामन मडावी यांना लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing mother with nine-year-old son