बेपत्त्ता युवकाचे पाचव्या दिवसी विहीरित आढळले प्रेत

मनोहर बोरकर
शनिवार, 28 जुलै 2018

विठ्ठल किसन बावने वय 34 वर्ष डोके दुखीच्या आजाराने त्रस्त युवक (ता. 24) मंगळवारी सकाळी घरून बेपत्त्ता झाला होता. त्यानंतर कुटुंबियांकडून सर्वत्र शोध घेत असतांना (ता 28) शनिवारी तब्बल पाच दिवसानंतर पंचायत समिती परिसरातील अलगडीच्या विहीरित प्रेत तरंगतांना काही नागरिकांना आढळून आले.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) - येथील विठ्ठल किसन बावने वय 34 वर्ष डोके दुखीच्या आजाराने त्रस्त युवक (ता. 24) मंगळवारी सकाळी घरून बेपत्त्ता झाला होता. त्यानंतर कुटुंबियांकडून सर्वत्र शोध घेत असतांना (ता 28) शनिवारी तब्बल पाच दिवसानंतर पंचायत समिती परिसरातील अलगडीच्या विहीरित प्रेत तरंगतांना काही नागरिकांना आढळून आले.

विठ्ठलचे लग्न झाले होते. मात्र, चार वर्षापूर्वी पत्नी घटस्फोट घेऊन निघुन गेली त्यामुळे तो आई-वडीलांकडे राहून मोलमजूरी करीत असे. तो या आधीही घरून निघुन जाऊन काही दिवसांनी स्वतःच परत आला होता विठ्ठल काही दिवसांपासून डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त असतांनाच मंगळवारी तो राहत्या घरून कोणालाही काही न सांगता निघुन गेला. त्यानंतर विठ्ठलचे प्रेतच कुटुंबाला मिळाले.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सचिन जगताप, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलीस उपनिरीक्षक नवाज शेख व कर्मचारी घटानास्थळी दाखल होऊन प्रेताला विहिरितून बाहेर काढून पंचनामा व उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title: The missing persons body was found in the fifth day