संघ, भाजपचे मिशन विधानसभा

संघ, भाजपचे मिशन विधानसभा
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि परिवारीतील संघटनांची दोनदिवसीय बैठक उद्या शनिवारपासून (ता. 24) शहरात आयोजित केली आहे. याकरिता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते प्रथमच शहरात येत असल्याने विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
भाजपने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, या पार्श्‍वभूमीवर संघ परिवारातील संघटनांची दोनदिवसीय बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे येत्या शनिवारी व रविवारी बोलावली आहे. समन्वय बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह संघटन सचिव विजय पुराणिक तसेच परिवाराच्या संघटनाचे विदर्भातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहतील. पहिल्या दिवशी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. ती रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरातील सभागृहात होईल. रविवारची बैठक जामठ्याजवळील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com