आमदार अग्रवाल यांना शिवीगाळ; न. प.च्या उपाध्यक्षांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

गोंदिया : येथील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या शंकर गल्ली गोरेलाल चौकातील निवासस्थानासमोर शिवीगाळ केल्याप्रकरणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदिया : येथील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या शंकर गल्ली गोरेलाल चौकातील निवासस्थानासमोर शिवीगाळ केल्याप्रकरणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (ता. 15) रात्री पावणेअकराच्या सुमारास आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या घरासमोर आल्यानंतर शिव शर्मा यांनी आमदार अग्रवाल यांना शिवीगाळ केली. या वेळी पोलिस शिपाई धीरज दीक्षित सुरक्षेच्या दृष्टीने तिथे तैनात होते. शर्मा शिवीगाळ करीत असताना दीक्षित हे त्यांना रोखण्यास गेले असता शर्मा याने त्यांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिस शिपाई दीक्षित यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी शिव शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीदेखील आमदार अग्रवाल यांच्यावर शिव शर्मा यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Aggarwal has be abuses