आमदार चरण वाघमारे यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

भंडारा : शासकीय कामात अडथळा निर्माण करून महिला पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी त्यांना जामीन मंजूर केला आहे.

भंडारा : शासकीय कामात अडथळा निर्माण करून महिला पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी त्यांना जामीन मंजूर केला आहे.
तुमसर येथील बाजार समिती पटांगणावर कामगारांना सुरक्षापेटी वाटपदरम्यान, भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्यासह आमदार वाघमारे यांच्यावर सुरक्षेसाठी तैनात महिला पोलिस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी तुमसर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आमदार वाघमारे यांच्या मागणीनुसार पोलिसांनी याप्रकरणी तपासही सुरू केला. मात्र, पोलिस अधीक्षक कार्यालयात बयाणासाठी बोलाविले असता, तेथेच त्यांना पोलिसांनी अटक केली. यामुळे आमदार समर्थकांनी रोष व्यक्त केला होता. पोलिसांनी आमदारावरील विनयभंगाचा गुन्हा मागे घेतला. मात्र, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी न्यायालयाने 10 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी भंडारा कारागृहात केली होती. विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्‍टोबर होती. यामुळे त्यांनी सोमवारी (ता. 30) जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मंगळवारी (ता. 1) जिल्हा न्यायालयाने निवडणूक अर्ज भरण्यासाठी 5 ऑक्‍टोबरपर्यंत जामीन दिला होता; तर, भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांना जामीन मिळाला होता. परत शनिवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Charan Waghmare bail