आमदार निवास परिसरात दारूच्या बाटल्यांचा सडा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

नागपूर : कार्यकर्ता विरोधकांचा असो की, सत्ताधारी पक्षाचा. अधिवेशनदरम्यान दहा ते पंधरा दिवस उपराजधानीत त्यांचा फुल्ल एन्जॉय असतो. यावर्षी हिवाळी अधिवेशनाची मौजमजा त्यांनी पावसाळी अधिवेशनातच घेतली. राज्यभरातील कार्यकर्त्याच्या जेवणासाठी जणू पंगत बसत असे, अशी गर्दी येथे दिसत होती. अधिवेशन संपले. कचरा मागे राहिला. त्या कचऱ्यात आमदार निवासाच्या सभोवताल दारूच्या बाटल्यांचा सडा दिसत होता.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुढाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा मुक्काम ज्या ठिकाणी असतो, तेथे कचरा पडलेला दिसत होता. परंतु कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून दारुच्या बाटल्यांची झाकणं डोकावून बघत असल्याचे चित्र येथे होते. या परिसरात सर्वत्र पसरलेला दारूच्या बाटल्यांचा सडा नजरेत भरणारा होता. जनतेच्या प्रश्नांवर होणाऱ्या अधिवेशनात दारुपार्ट्याची जत्रा येथे रंगत असल्याचे चित्र यावरून दिसत होते. दारुच्या बाटल्यांचा खच दर दिवसाला येथे पडत होता.
नागपुरात मुक्कामी येणारे विधिमंडळाचे सदस्य आमदार निवासात न थांबता हॉटेल्समध्ये राहतात. तसा हा अनुभव जुनाच आहे. आमदारांच्या सोयीसाठी आमदार निवासात 384 खोल्यांची व्यवस्था आहे. त्यापैकी 340 खोल्या सदस्यांसाठी दिल्या जातात. यापैकी यंदा तब्बल 180 सदस्यांनी आमदार निवासातील सदनिकांचा वापर केला.
दहा दिवसांसाठी पिकनिक स्पॉट
आमदार निवास परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता स्वतंत्र कॅंटिनची व्यवस्था आहे. येथील खानावळीत दर दिवसाला तीन ते साडेतीन हजार व्यक्ती जेवण करत असत. दहा दिवस जणू आमदार निवास हा पिकनिक स्पॉट बनले होते, असे चित्र होते. आमदार निवास परिसरात जागोजागी विखुरलेल्या दारूच्या बाटल्यांचा सडा मात्र काहीतरी वेगळेच सांगून जाते.

Web Title: mla hostel news