अकोल्याच्या आमदार कुसुमताई कोरपे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

अकोला - अकोला जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवारी निधन झाले. समाजसेवेला ज्ञानाची जोड देत सहकार व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.

डॉ. कुसुमताई कोरपे यांचे वडील श्रीधर गोविंद सपकाळ हे त्यांच्या काळातील नामवंत कायदेपंडित व प्रसिद्ध राजकीय पुढारी होते.

महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे प्रणेते दिवंगत सहकार महर्षी डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या पत्नी होत्या. "विदर्भातील 20 व्या शतकातील ग्रामीण नेतृत्वाचा विकास' हा त्यांचा शोध प्रबंधाबद्दल नागपूर विद्यापीठाने त्यांना पीएच. डी पदवी प्रदान केली. 1957 ते 1967 या दहा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक समाजपयोगी भरीव केलीत. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोन वेळा विजयी झाल्या होत्या. अमेरिका, युरोप, जपान व हवाई बेटे या पाश्‍चात्य देशांना भेटी देऊन त्यांनी तेथील सहकारी चळवळ व सामाजिक संस्कृतीचे अध्ययन केले. त्यांनी "प्रदक्षिणा भूमातेची' तसेच वडील श्रीधर सपकाळ यांच्यावर "पिताश्री' ही पुस्तके लिहिली आहेत. कुसुमताई यांच्या मागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोष कोरपे यांच्यासह तीन पुत्र व तीन कन्या आहेत.

Web Title: mla kusumtai korape death