विदर्भातील 'स्वाभिमानी' आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612527674157,"A":[{"A?":"I","A":54,"B":738.9486345272805,"D":177.1380296898291,"C":54.429685486511126,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"A":-3.55271
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612527674157,"A":[{"A?":"I","A":54,"B":738.9486345272805,"D":177.1380296898291,"C":54.429685486511126,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"A":-3.55271

अमरावती : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पक्षबदलांचा खेळ सुरु आहे. नेतेमंडळीचं या पक्षातून त्या पक्षात इनकमिंग सुरु आहे. काही दिवसांआधी भाजप आणि  काँग्रेसमधील काही नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र आता यात स्वाभिमानीच्या आमदारांचं नावही चर्चेत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. त्याच कारणही तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीनं सध्या संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जयंत पाटील, अनिल देशमुख यांसारखी नेतेमंडळी पदाधिकाऱ्यांशी आणि नेत्यांशी संवाद साधत आहेत. 

विशेष म्हणजे हा कार्यक्रम फक्त राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांसाठी आहे. मात्र यावेळी स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयारही कार्यक्रमात दिसून आले. त्यामुळे आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. 

भुयार पक्षावर नाराज?

काही दिवसांपूर्वी दवेंद्र भुयार यांनी आपल्याला पक्षातील काही बड्या नेत्यांमुळे मंत्रिपद मिळालं नाही याबाबत खंत व्यक्त केली होती. यानंतर लगेच ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

गेल्या काही महिन्यात एकनाथ खडसेंसारख्या मोठ्या नेत्यानं राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तसंच उपराजधानीत भाजपचे उपमहापौर सतीश होते आणि काँग्रेस नेत्या आभा पांडे हे सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com