आमदार भवनात आढळला आमदाराच्या पीएचा मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

अधिवेशनासाठी राज्यभरातुन आमदार त्यांच्या ताफ्यासह नागपुरात आले आहेत. आमदार निवासात स्वीय सहायकासह कार्यकर्ते आहेत. आज सकाळी मात्र आमदाराचे स्वीय सहायक रूम क्रमांक 43 मध्ये मृत आढळले.

नागपूर : मुंबई पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे स्विय सहायक (पीए) विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी आमदार निवासात आढळला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अधिवेशनासाठी राज्यभरातुन आमदार त्यांच्या ताफ्यासह नागपुरात आले आहेत. आमदार निवासात स्वीय सहायकासह कार्यकर्ते आहेत. आज सकाळी मात्र आमदाराचे स्वीय सहायक रूम क्रमांक 43 मध्ये मृत आढळले. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्य झाल्याचे समजते.

Web Title: MLA PA found dead in Nagpur