आमदार फुके यांनी केली जबर मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नागपूर- विरोधात प्रचार करणाऱ्या आणि पत्रके वाटल्याने भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी भाजपचाच कार्यकर्ता घनश्‍याम चौधरी आणि त्याचा मित्र भाऊराव वाघाडे यांना जबर मारहाण केली. मारहाणीत चौधरी गंभीर जखमी झाला. त्याला रविनगर चौकातील दंदे इस्पितळात दाखल केले आहे. घटना कळताच शेकडो कार्यकर्त्यांनी इस्पितळाकडे धाव घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अंबाझरी पोलिसांनी चौकशीसाठी फुके यांना ताब्यात घेतले होते. 

आमदार परिणय फुके यांची पत्नी परिणीता फुके महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार आहेत. अमर बागडे त्यांच्या प्रभाग क्रमांक 13 चे भाजपचे उमेदवार आहेत. घनश्‍याम चौधरी काही दिवसांपासून फुके आणि बागडे यांच्या विरोधात पत्रके वाटत होता. फुके यांना मतदान करू नका, असा सल्ला राष्ट्रीय सेवक संघाने दिल्याचे पत्रक त्याने छापले होते. त्यामुळे फुके आणि चौधरी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद होत होता. 

मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता अंबाझरी परिसरातील वर्मा ले-आउट येथे घनश्‍याम चौधरी फिरत असताना फुके व त्यांच्या समर्थकांनी "आमच्या विरोधात पत्रके का वाटली' अशी विचारणा केली. यानंतर आमदार फुके, अमर बागडे आणि भाजपच्या अन्य कार्यकर्त्यांनी घनश्‍याम चौधरीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घनश्‍यामने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत चौधरी गंभीर जखमी झाला. चौधरी आणि वाघाडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत आमदार फुके तसेच अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. 

कारची तोडफोड 
आमदार परिणय फुके हे कारने वर्मा ले-आउटमध्ये गेले होते. घनश्‍याम चौधरी यांना मारहाण केल्यामुळे तेथील वातावरण तापले होते. दरम्यान, संतप्त नागरिकांनी फुके यांच्या कारची तोडफोड केली. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन अंबाझरी पोलिस स्टेशन परिसरात उभी केली होती. 

इस्पितळासमोर तणाव 

चौधरी व वाघाडे यांना आमदारांनी मारहाण केली, ते गंभीर जखमी असल्याने समता परिसरातील नागरिकांनी दंदे इस्पितळाकडे धाव घेतली. माजी खासदार विलास मुत्तेमवार, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरेसुद्धा दाखल झाले. तणाव वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा बोलावण्यात आला. यामुळे दंदे इस्पितळाच्या परिसरात छावणीचे स्वरूप आले होते.

Web Title: MLA phuke badly beaten