esakal | ब्रेकिंग : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणांनी रोखला महामार्ग; वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ravi Rana agitation for the demands of farmers

‘मुख्यमंत्री तुपाशी व शेतकरी उपाशी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे तसेच बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आली.

ब्रेकिंग : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणांनी रोखला महामार्ग; वाहतूक ठप्प

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

तिवसा (जि. अमरावती) : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत सरकारने करावी व चार महिन्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे या मागणीसाठी आमदार रवी राणा व युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याकत्र्यांनी शुक्रवारी अमरावती-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

शुक्रवारी (ता. १३) दुपारी १२ वाजता या आंदोलनाला गुरुकुंज मोझरी येते सुरुवात झाली. आमदार रवी राणा व युवा स्वाभिमान पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

‘मुख्यमंत्री तुपाशी व शेतकरी उपाशी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे तसेच बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आली.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

सध्या सरकारने जी मदत दिली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे, असा आरोप यावेळी रवी राणा यांनी केला. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. आमदार राणा आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली होती.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image