माजी आमदार संजय बंड यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

अमरावती - माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड (54) यांचे गुरुवारी (ता. 13) हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. गत तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे घराशेजारील डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते. गुरुवारी देखील ते तपासणी करण्याकरीता पायीच रुग्णालयात गेले होते. मात्र तिथेच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. संजय बंड यांनी अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती.

अमरावती - माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड (54) यांचे गुरुवारी (ता. 13) हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. गत तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे घराशेजारील डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते. गुरुवारी देखील ते तपासणी करण्याकरीता पायीच रुग्णालयात गेले होते. मात्र तिथेच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. संजय बंड यांनी अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती. शुक्रवारी (ता.14) दुपारी रूख्मिणीनगर, विवेकानंद कॉलनी येथील त्याच्या निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: MLA Sanjay Band Passed Away