आमदार श्‍वेता महाले उतरल्या दिल्लीच्या मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

आपले संघटन कौशल्य आणि जनसंपर्काची आगळी वेगळी शैली यासाठी आमदार श्‍वेता महाले या भारतीय जनता पक्षात सर्वपरिचित आहेत.

चिखली (जि.बुलडाणा) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा आमदार श्‍वेता महाले या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या आहेत. पक्षाने त्यांना मॉडेल टाऊन आणि सदर बाजार या दोन मतदारसंघांची जबाबदारी सोपविली आहे. 

या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार कपिल मिश्रा आणि जयप्रकाश भाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या हस्ते 31 जानेवारीला वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला. आपले संघटन कौशल्य आणि जनसंपर्काची आगळी वेगळी शैली यासाठी आमदार श्‍वेता महाले या भारतीय जनता पक्षात सर्वपरिचित आहेत. त्यांच्यातील या वैशिष्ट्यांची दखल घेऊन पक्षाने त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विशेषत्वाने पाठवले.

महत्त्वाची बातमी - 909 वर्षांपूर्वी आला होता असा योग, पहा आजच्या तारखेचे वैशिष्ट्य

नेतृत्वात प्रचार फेऱ्यांचे आयोजन
दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा नारळ फुटला. श्‍वेता महाले यांच्या नेतृत्वात प्रचार फेऱ्यांचे आयोजन केले होते. वसंत पंचमीचा दिल्लीत फार मोठा उत्सव साजरा करण्यात येत असतो. या निमित्त दिल्ली मधील गीता नगर राम मंदिर, जुनी गुप्ता कॉलनी, लक्ष्मी नारायण मंदिर या ठिकाणी सरस्वती पूजन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA shweta mahale in delhi election