स्वच्छता न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन 

MNS
MNS

खामगाव : सरकार स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च करुन स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे जनजागृती पर कार्यक्रम राबविले जात आहे परंतु सरकार ज्या अधिकार्‍यांवर ही जबाबदारी सोपविते तेच अधिकारी या स्वच्छतेच्या कामाला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने नियमित स्वच्छता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

येथील प्रशासकीय इमारतीची साफसफाई करण्यात यावी याबाबत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. मात्र या निवेदनाची दखल न घेतल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करीत 5 नोव्हेंबरला प्रशासकीय कार्यालयाची साफसफाई केली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या भिंती पान, गुटख्याच्या पिचकार्‍यांनी रंगलेल्या होत्या. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. वारंवार तक्रारी करुनही याकडे सदर अधिकारी दुर्लक्ष करतात. स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्व कार्यालयांमध्ये साफसफाई अभियान राबविले. भाजपा सरकारने स्वच्छतेचा मोठा गाजावाजा करत स्वच्छतेचे बोर्ड लावले. परंतु सरकारी कार्यालयेच घाणीच्या विळख्यात पडली आहेत. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी 8 दिवस अगोदर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना साफसफाई करण्याबाबत निवेदन दिले होते. पण शासनाने या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे  मनसेचे बाबा काळे, नंदु भट्टड, आनंद गायगोळ, आकाश पाटील  आदि कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान देखील राबविले होते व यापुढे नियमित स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा देखील दिला आहे.

स्वच्छ भारत मिशनवर सरकारने करोडो रुपये खर्च केला आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती केली गेली. त्यास लोक त्यास चांगला प्रतिसाद देत आहेत. खामगावच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मात्र प्रचंड घाण असून हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार असाच आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.
- नंदू भट्टड ,मनसे खामगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com