मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या वाढीव दराविरोधात मनसेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

मल्टिप्लेक्समधील अव्वाच्या सव्वा किमतीत खाद्यपदार्थ विक्री केली जाते. याविरोधात मनसेने पीव्हीआरमध्ये आंदोलन केले. मल्टिप्लेक्स सिनेमागृहात खाद्यपदार्थांसाठी वाढीव दर आकारण्याच्या विरोधात मनसेच्या वतीने नागपुरातही एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआरमध्ये आंदोलन केले. 

नागपूर : मल्टिप्लेक्समधील अव्वाच्या सव्वा किमतीत खाद्यपदार्थ विक्री केली जाते. याविरोधात मनसेने पीव्हीआरमध्ये आंदोलन केले. मल्टिप्लेक्स सिनेमागृहात खाद्यपदार्थांसाठी वाढीव दर आकारण्याच्या विरोधात मनसेच्या वतीने नागपुरातही एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआरमध्ये आंदोलन केले. 

मल्टिप्लेक्समध्ये पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना, 10 रुपयांचा बटाटावडा किंवा समोसा 100 रुपयांना आणि 60 रुपयांना पाण्याची बाटली विकली जात असल्यामुळे मनसेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. ग्राहकांची लूट थांबवा नाहीतर मल्टिप्लेक्स बंद करा, अशा घोषणा देऊन मनसैनिकांनी पीव्हीआर दणाणून सोडला. पीव्हीआर व्यवस्थापनाला यासंदर्भातील मनसेने निवेदनही दिले. यापूर्वीही अनेकदा या प्रश्नावर आवाज उठवूनही मल्टिप्लेक्स व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणा यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे मनसेने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला. 

मनसेकडून मिळालेल्या निवेदनावर आपण लवकरच कार्यवाही करु, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. पीव्हीआर व्यवस्थापनाने जर आठवड्यात जर हे दर कमी केले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: MNS movement against the increase in food prices of multiplexes