मोबाईल चोरांची टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नागपूर - मोबाईल चोरीच्या एका प्रकरणात पाचपावली पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोबाईल चोरट्यांची टोळीच पोलिसांच्या हाती लागली. त्यात एका महिलेचाही  समावेश असून आरोपींकडून ३.७३ लाख रुपये किमतीचे ३२ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

शेख सलीम शेख युसूफ (२६) रा. चपराशीपुरा कॅम्प, फेजपुरा, अमरावती, शेख अफरोज शेख युसूफ (२६) रा. गवळीपुर, बडनेरा आणि शमा बेगम शेख शब्बीर (२७) रा. अमरावती अशी आरोपींची नावे असून तिघेही सध्या पाचपावली ठाण्याच्या हद्दीतील बंगाली पंजा परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. वैशालीनगर येथील रहिवासी असरार अहमद इफ्तखार अहमद अंसारी हे मंगळवारी दुपारी शनिचरा मार्केट, कमाल चौकात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. आरोपींपैकी एकाने त्यांच्या पॅंटच्या मागील शिखातून मोबाईल काढला पळून जात असताना  असरार यांनी त्याला बघितले होते. त्यांनी लागलीच पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. आरोपीबाबतचे वर्णनही सांगितले. त्या आधारे पाचपावली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. काही वेळेतच असरार यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार काही आरोपींना ताब्यात घेतले. असरार  यांनी आरोपीला ओळखले. सखोल चौकशीत तो एकटा चोऱ्या करीत नसून संपूर्ण रॅकेटच  कार्यरत असल्याचे पुढे आले. त्याच्या अन्य दोन साथीदारांच्याही पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. 

Web Title: Mobile gang of robbers arrested