अकोला- युवासेना सेनेच्या मॉक टेस्टला तरूणाईचे प्रचंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

अकोला- विद्यार्थी वर्गाचा विश्वास अल्पकाळात जिंकुन त्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक बनवण्याचा मान आज युवासेनेला मिळाला. दोन महाविद्यालायात झालेल्या मॉक टेस्टला तरूणाईचे उधाण आले होते.युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उत्तम नियोजनाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे.

युवासेना आयोजीत मॉक टेस्ट २०१८ मध्ये अकोल्यात रविवारी सुमारे दोन हजार विद्यार्थांनी नीट,सीईटीची सराव परिक्षा दिली.महानगरातील दोन प्रमुख केंद्रावर पार पडलेल्या या परिक्षेला विद्यार्थ्यांनी रेकार्ड ब्रेक गर्दी केली. युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ठ नियोजनाचे मुळे परिक्षा सुरळीत पार पडली असुन युवासेनेच्या या उपक्रमाचे  पालकांनी  भरभरून कौतुक केले आहे. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्याथ्र्या साठी युवासेना पुरस्कृत मॉक टेस्ट (नीट सीईटी) परीक्षा रविवारी अकोल्यातील रालातो महविद्यालय व सिताबाई कला महाविद्यालयात पार पडली. मेडिकल, इंजिनिअरींग, लॉ, फार्मसी या पदवीसाठी शासनाने महाराष्ट्र कॉमन इंटरस टेस्ट अनिवार्य केली आहे. सी.ई.टी,नीट परीक्षा २०१८ च्या पार्श्वभूमीवर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा रविवारी सकाळी १० सुरू करण्यात आली.

Web Title: mock test conducted by yuva sena in akola