मोदी देशाला दिशा देणारे पंतप्रधान

नागपूर : "पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताना नितीन गडकरी; सोबत विवेक ओबेरॉय.
नागपूर : "पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करताना नितीन गडकरी; सोबत विवेक ओबेरॉय.

नागपूर : भारतात 50 वर्षांत घडले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. वंचित, गरिबांना केंद्रबिंदू माणून नवीन योजना आणि देशाला दिशाही त्यांनी दिली. त्यांच्याशी संबंधित अस्पर्शित बाकी या चित्रपटातून समाजासमोर येतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित "पीएम नरेंद्र मोदी' चिटपट लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण सोमवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात ते बोलत होते. अभिनेता विवेक ओबेरॉय, निर्माते संदीप सिंह उपस्थित होते. गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला जगभरात प्रतिष्ठा मिळाल्याचे सांगितले. मोदींसंदर्भातील चांगल्या गोष्टी समाजापुढे याव्यात या हेतूने प्रदर्शित होत असलेला हा चित्रपट स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले.
चित्रपट रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न
हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी अनेक अडचणी आणल्या गेल्या. महागठबंधन मोदींविरोधात उभे ठाकले, अगदी त्याच पद्धतीने चित्रपटाच्या विरोधातही महागठबंधन उभे राहिले. वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोर्टात खटले दाखल असून, तारखांनाही न जाणाऱ्यांनी आम्हाला कोर्टात खेचले. सतत कमिशन घेणाऱ्या राजकारण्यांनी आम्हाला इलेक्‍शन कमिशनसमोर उभे केले. देशाचा फायदा व्हावा आणि राजकारणात नवे आदर्श प्रस्थापित व्हावे, या भूमिकेतून चित्रपटाची टीम प्रयत्नरत असल्याचे चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेराय म्हणाला.
चांगल्या कामात अडचणी येतातच
चांगल्या कामात अडचणी येतातच. चांगल्या रस्त्यावरही अपघात टाळण्यासाठी स्पीडब्रेकर लावावे लागतात. पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या निर्मितीत कितीही अडचणी आल्या असल्या तरी हा चित्रपट केवळ मनोरंजनच करणार नाही तर जगाला चांगला संदेशही देईल, असा विश्‍वास व्यक्त करतानाच नितीन गडकरी यांनी चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या राजकारणावर भाष्य केले.
आ रहे दोबारा पीएम मोदी
रविवारीच आलेल्या एक्‍झिट पोलमध्ये नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत मिळत आहे. परंतु, प्रत्यक्ष निकालापूर्वीच प्रदर्शित पोस्टरवर "आ रहे है दोबारा पीएम नरेंद्र मोदी, अब कोई रोक नहीं सकता', असा संदेश नमूद होता. यामुळे पुन्हा एकदा चित्रपटाविषयी चर्चा सुरू झाली असून, विरोधक पुन्हा एकदा वाद उखरून काढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com