हिंदू समाज आणि भारत यांची विभागणी करता येणार नाही: मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

हिंदू समाजामुळे भारताची जगभरात सज्जन देश म्हणून प्रतिमा निर्माण होत असून हिंदू समाज आणि भारत यांची विभागणी करता येणार नसल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूर : हिंदू समाजामुळे भारताची जगभरात सज्जन देश म्हणून प्रतिमा निर्माण होत असून हिंदू समाज आणि भारत यांची विभागणी करता येणार नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भागवत उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "जम्मू-काश्‍मीरमध्ये फुटीरतावादी कारवाया करून देश अशांत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे प्रकार थांबत नसल्याने आता कठोर उपाययोजना कराव्या लागतील.' गोहत्या बंदीबाबत बोलताना त्यांनी महात्मा गांधी यांनी 1920 च्या नागपूर अधिवेशनात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा ठराव मांडल्याचे सांगितले. यावेळी नेपाळचे लष्करप्रमुख जनरल कटवाल उपस्थित होते.

Web Title: mohan bhagwat rss hindu india rss nagpur news marathi news maharashtra news