डॉन आंबेकरसह 8 आरोपींवर मोक्‍का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नागपूर ः कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकरसह त्याच्या आठ साथीदारांवर मोक्‍का लावण्यात आला. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. तसेच न्यायालयाने आंबेकरला आता दहा दिवस (ता. 1 नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आज बुधवारी त्यांची कोठडी समाप्त झाल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. संतोष आंबेकर व त्याचा भाचा नीलेश केदार (रा. नागपूर) व जुही चौधरी (39), चंदन चौधरी (44, मुंबई) तसेच अमितकुमार महेंद्रभाई पटेल, अरविंदभाई पटेल, अजय पटेल, सराफा व्यापारी राजा अरमरकर यांच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे.

डॉन आंबेकर आणि त्याच्या साथीदारांनी गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांची पाच कोटींनी फसवणूक करून त्यांना आणखी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रथम संतोष नंतर नीलेश आणि मुंबई येथून चौधरी दाम्पत्याला अटक केली होती. गुजरातमधील अंकलेश्वर येथील अंकित महेंद्रभाई पटेल, अरविंदभाई पटेल, अजय पटेल यांनी हवालामार्फत आरोपींनी पैसा वळता केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरही मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणातील इतवारीतील सराफा व्यापारी राजा अरमरकर याच्यावरही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला उद्या, गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokka on 8 accused including Don Ambaker