गुंड सुमित ठाकूरवर ‘मोक्‍का’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नागपूर - भाजपचा माजी पदाधिकारी व कुख्यात गुंड सुमित ठाकूर आणि टोळीतील १२ जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्‍का) कारवाई केली. नागपूर शहर पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. सुमित ठाकूरला नुकतेच मिस इंडिया उर्वशी साखरे हिच्या घरातून अटक केली होती.

नागपूर - भाजपचा माजी पदाधिकारी व कुख्यात गुंड सुमित ठाकूर आणि टोळीतील १२ जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्‍का) कारवाई केली. नागपूर शहर पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. सुमित ठाकूरला नुकतेच मिस इंडिया उर्वशी साखरे हिच्या घरातून अटक केली होती.

२६ जूनला कुख्यात गुंड कुलदीप ऊर्फ पिन्नू शशीधर पांडे (२७, रा. अहबाब चौक) हा नवनीत बारजवळ असताना सुमित ठाकूर व टोळीने फायरिंग करून जखमी केले होते. या गोळीबारात रस्त्यावरील दोन व्यक्‍तीही जखमी झाले होते. या गुन्ह्यात गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली. यात उजैर उर्फ उज्जी परवेज अब्दुल खालीद (३०, रा. भूपेशनगर), पीयूष गजानन वानखेडे (२२, रा. सुरेंद्रगड) व सुमित राजकुमार ठाकूर (३०, रा. प्रेरणा कॉलनी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्टल मॅग्झीन जप्त केले.

सुमित ठाकूरने सक्रिय गुंडांची टोळी तयार केली. अटक केलेल्या तिघांसह नौशाद पीर मोहम्मद खान (२७, रा. मोमीनपुरा डोबीनगर), मोहम्मद इरफान ऊर्फ बंदुकीयाँ सामी सिद्दिकी (३७, रा. जाफरनगर), सूर्यप्रकाश उर्फ पिंकू हरीप्रसाद तिवारी (३०, रा. सुरेंद्रगढ), मनोज उर्फ मोन्या प्रकाश शिंदे (३२, रा. बोरगाव), विनय उर्फ लाला राजेंद्रप्रसाद पांडे (३०, रा. अनंतनगर), जुनेद उर्फ जिशान गुलशेर खान (२६, रा. महेशनगर), अमित ऊर्फ अन्ना नरेंद्रकुमार स्वामी (२५, रा. विनोबा भावेनगर), वजुल ऊर्फ सॅम बिष्ट (४०, रा. गिट्टीखदान), सय्यद शाहनवाज अली सय्यद जाकीर अली (२२, रा. विनोंबा भावेनगर), नीलेश अशोक उके (२७, रा. रविनगर) यांच्यावरही मोक्‍का लावला आहे.

अनेक गुन्हे दाखल
सुमित ठाकूर व गॅंगविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये नागरिकांना मारहाण करणे, ठार मारणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वरील कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर विविध कायद्यांन्वये प्रतिबंधक कारवाई केलेली आहे.

Web Title: Mokka on Gund Sunit Thakur Crime