हुंडीचिठ्ठीचे व्यवहार डगमगले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

शैलेंद्र व्यासकडून अमित डोडीयाने घेतलेले १६ धनादेश व आठ चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. त्याच्या चौकशीमध्ये काही व्यापाऱ्यांचीही नावे समोर आली आहेत. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. 
- गणेश अणे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.

अकोला : हुंडीचिठ्ठी या व्यवसायात मोठे नाव असलेल्या अमित डोडीयाच्या अटकेमुळे या व्यवसायातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच हा व्यवहारही डगमगला आहे. त्यासोबतच पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये काही व्यापाऱ्यांची नावेही समोर आली असल्याने अमित डोडीयांसह त्याच्या व्यापारी साथीदारांची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अवैध सावकारी, हुंडीचिठ्ठी या व्यवसायामध्ये अमित डोडीया याने अल्पावधित मोठे नाव कमाविले. त्याच्या व्यवहारामुळे अनेक व्यापाऱ्यांना फायदाही झाल्याचे समजते. त्यामुळे तो आधी व्यापाऱ्यांना आमिष दाखवून आपल्याकडे वळवित होता. नंतर त्यांच्या आर्थिक गरजा अकोल्यातच नव्हे तर परराज्यातही तो पूर्ण करीत होता. त्याने या व्यवसायात चांगलाच वट निर्माण केल्याने तो कोट्यवधींचे व्यवहार सेकंदात करीत असल्याचे समजते. त्यामुळेच त्याच्यावर झालेल्या कारवाईने अनेक व्यापाऱ्यांनी हे प्रकरण निपटविण्याचाही प्रयत्न केला असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु, आर्विभावात असलेल्या अमित डोडीयाने त्याच्या सहकारी व्यापाऱ्यांचेही एेकले नसल्याने तेही आर्थिक अडचणीत आल्याचे बोलल्या जात आहे. तसेच त्याच्या माध्यमातून झालेले व्यवहारही डगमगले असल्याची चर्चा आहे. अवैध सावकारीमधून त्याने अनेकांना देशोधडीला लावले असल्याची चर्चा आहे. अनेक व्यापारी त्याच्या कर्ज वसुलीमुळे जिल्हाच सोडून गेल्याचेही समजते.  

शैलेंद्र व्यास, प्रसाद गणगेसह आदींनी त्याच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारींमुळे त्याच्याकडून पोलिस आता सर्व व्यवहार तपासणार आहेत. 

शैलेंद्र व्यासकडून अमित डोडीयाने घेतलेले १६ धनादेश व आठ चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. त्याच्या चौकशीमध्ये काही व्यापाऱ्यांचीही नावे समोर आली आहेत. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. 
- गणेश अणे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.

Web Title: money business in Akola