संग्रामपूरातील सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेचे पैसे अडकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

गतवर्षी वरवट बकाल येथे आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत मूग, उडीद, सोयाबीन आदी धान्याची खरेदी करण्यात आली. यामध्ये सब एजंट म्हणून शेतकी खरेदी विक्री संस्था काम पाहते. आलेल्या मालाची ग्रेडिंग करण्याची जबाबदारी स्टार अॅग्रो कंपनीचे सर्वेअर आणि बाजार समिती चे ग्रेडर याची होती.

संग्रामपूर (बुलढाणा) - गतवर्षात नाफेड अंतर्गत खरेदी मध्ये सर्वेअर आणि ग्रेडर याचे चुकीमुळे संग्रामपूर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेचे पावणे दोन लाख रुपये अडकल्याची माहिती बाहेर आली आहे. यामुळे संस्थेला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

गतवर्षी वरवट बकाल येथे आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत मूग, उडीद, सोयाबीन आदी धान्याची खरेदी करण्यात आली. यामध्ये सब एजंट म्हणून शेतकी खरेदी विक्री संस्था काम पाहते. आलेल्या मालाची ग्रेडिंग करण्याची जबाबदारी स्टार अॅग्रो कंपनीचे सर्वेअर आणि बाजार समितीचे ग्रेडर याची होती. माल खरेदी करताना एफएक्यू प्रतिचाच माल खरेदी करण्यात यावा अशा सूचना होत्या. मात्र त्या सूचनांचे या केंद्रावर पालन झाले नसल्याचे उघड होत आहे.

वरवट बकाल येथून खरेदी झालेला माल महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ चे गोडाऊन मधून जवळपास चार ते पाच वेळा गाड्या या केंद्रावर प्रतवारी चे कारणावरून परत आल्याने त्या गाड्यांचे भाडे बाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ज्या गाड्या परत आल्या. त्याच्या भाड्याचा भुर्दंड जिल्हा मार्केटिंग शेतकरी संस्थेच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीने जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना 3 मे 2018 ला दिलेल्या पत्रात संस्थेच्या कमिशन मधून रक्कम कपात करू नये असे नमूद केलेले आहे.

केंद्रावर नॉन एफएक्यू प्रतीचा माल खरेदी करताना संस्थेच्या सचालक व व्यवस्थापक यांनी सदर माल अडविला होता. त्यावेळी संबंधित सर्वेअर आणि ग्रेडर यांनी ही आमची जबाबदारी आहे आम्ही पाहू. असे सांगून नॉन एफएकयु माल खरेदी करून गोडाऊनला पाठविला. तो सर्व माल गोडाऊन वरून परत आला. हा सर्व प्रकार संस्थेने जिल्हा उपनिबंधक याचे निदर्शनास आणून दिली आहे. करीता परत आलेल्या गाड्याचे भाडे बाबत संबंधित सर्वेअर आणि ग्रेडर याचे सोबत संपर्क करावा आणि संस्थेच्या कमिशन मधून भाड्याची रक्कम कपात करू नये. असे पत्र दिलेवरही जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी शेतकी संस्थेच्या कमिशन मधील 1 लाख 85 हजार रुपये सुरक्षा रक्कम म्हणून अडकवून ठेवल्याचे समजते.

अगोदरच आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्याची ही संस्था दुबळी आहे. शासनाचे विविध योजनेच्या माध्यमातून कमिशन वर कसातरी कारभार सहकारातील या संस्थेचा सुरू आहे. शेतकरी हित पाहता संस्था जिवंत राहाव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणे गरजेचे दिसत आहे.

Web Title: Money stuck of cooperation farmers purchase sales organisation in sangrampur