मॉन्सूनपूर्व पावसाची शहरात दमदार हजेरी

नागपूर :  शहरात सोमवारी दुपारनंतर अचानक जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.
नागपूर : शहरात सोमवारी दुपारनंतर अचानक जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.

नागपूर : मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना सोमवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मॉन्सूनच्या आगमनापर्यंत विदर्भात असाच ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
शहरात दिवसभर उन्हाचे तीव्र चटके जाणवले. पारा पुन्हा 46 अंशांवर गेल्याने उकाडा जाणवला. मात्र, सायंकाळ होताच वातावरण अचानक बदलले. पाचच्या सुमारास आभाळ भरून आले. पाहतापाहता वादळी पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक भागांत जवळपास अर्धा तास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस बरसला. विशेषत: दक्षिण नागपुरातील वर्धा रोड, सोमलवाडा, खामला, प्रतापनगर, अजनी या भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आडोसा शोधावा लागला. हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस विदर्भात उन्हाच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच वादळाचीही शक्‍यता वर्तविली आहे. सध्या केरळ व तमिळनाडूच्या दक्षिण भागात सक्रिय असलेल्या मॉन्सूनची प्रगती समाधानकारक असली तरी, विदर्भात यायला किमान आठवडा लागणार असल्याचे हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com