सहा वर्षांत यंदा सर्वाधिक पाऊस

सहा वर्षांत यंदा सर्वाधिक पाऊस

नागपूर : मॉन्सूनने यंदा पावसाच्या आकडेवारीत इतिहास घडविला आहे. या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये विदर्भात गेल्या सहा वर्षांतील विक्रमी 1055 मिलिमीटर बरसला. नागपुरातही पावसाचा नवा उच्चांक नोंदला गेला आहे. 
प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सरासरी 943 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, दोन आठवडे उशिरा आगमन होऊनही 12 टक्‍के अधिक पाऊस पडला. 1901 पासूनची आकडेवारी बघितल्यास यंदाचे वर्ष 25वे सर्वाधिक पावसाचे व 2007 नंतर दुसरे वर्ष ठरले. 2014 मध्ये विदर्भात 817 मिलिमीटर, 2015 मध्ये 848 मिलिमीटर, 2016 मध्ये 1044 मिलिमीटर, 2017 मध्ये 731 मिलिमीटर आणि गेल्या वर्षी 875 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. संपूर्ण देशात 10 टक्‍के जास्त पावसाची नोंद करण्यात आली. 
नागपुरातही पावसाने मागील सहा वर्षांतील नवा विक्रम केला. शहरात या वेळी तब्बल 1170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी सरासरीच्या (920 मिलिमीटर) 27 टक्‍के अधिक आहे. विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद गडचिरोली येथे (1870 मिलिमीटर) येथे झाली. जी 48 टक्‍के अधिक आहे. तर, सर्वांत कमी (563 मिलिमीटर) पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झाला. येथे सरासरीच्या 30 टक्‍के कमी पावसाची नोंद करण्यात आली. वाशीममध्येही (634 मिलिमीटर) सरासरीच्या 20 टक्‍के कमी पाऊस झाला. आश्‍चर्याची बाब म्हणजे, या वर्षी सर्वाधिक पाऊस (388 मिलिमीटर) सप्टेंबर महिन्यात बरसला. जो सरासरी (168 मिलिमीटर) पावसाच्या 131 टक्‍के अधिक आहे. हासुद्धा गेल्या सहा वर्षांत सप्टेंबरमधील विक्रम ठरला. जूनमध्ये केवळ 168 मिलिमीटर, जुलैमध्ये 304 मिलिमीटर आणि ऑगस्टमध्ये 281 मिलिमीटरची नोंद करण्यात आली. 
दिवाळीही पावसातच? 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने या वर्षीची दिवाळी पावसात जाण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या "विकेंड'पर्यंत विदर्भात पावसाळी वातावरण राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीवर पावसाचे दाट सावट राहणार आहे. हवामान विभागाने बुधवारपासून तीन दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचाही इशारा दिलेला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com