#MonsoonSession पुणे मेट्रोसाठी ३१२  कोटी

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - राज्य सरकारने समभागापोटी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३१२ कोटी ७६ लाख रुपयांची तर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची जादा तरतूद विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बुधवारी (ता. ४) पुरवण्या मागण्यांमध्ये केली. नगरविकास विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये हा जादा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २०१८-१९ खर्चाचे पूरक विवरणपत्र विधानसभेत मांडले. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या दुय्यम कर्जासाठी १३० कोटी रुपयांची जादा तरतूद केली आहे. त्यामध्ये तीस कोटी रुपये पुण्यासाठी, तर नागपूर व मुंबईसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांची तरतूद आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी दुय्यम कर्जाकरिता ११७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी तरतूद केल्यामुळे पुण्यातील कामांना गती मिळणार आहे. 

कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे जानेवारीमध्ये झालेल्या दंगलीतील बाधितांना मदत करण्यासाठी चालू आर्थिक वर्षांत केलेली तरतूद अपुरी असल्यामुळे त्यासाठी आणखी सात कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी सेवेसाठी सात कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद, तसेच यंत्रसामग्रीच्या देखभालदुरुस्तीसाठी ७४ लाख रुपयांची आणि  पुरवठा व सामग्रीसाठी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बारामती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती आणि अन्य कामांसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीतील कामांसाठी पाच कोटी वीस लाख रुपयांची जादा तरतूद करण्यात आली. 

Web Title: Monsoon Session 312 Crore for Pune Metro