शिवसेना वाढविणार भाजपची डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आता शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत आमदार नीलम गोऱ्हे, सुरेश प्रभू आणि अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. त्यामुळे भाजपला सत्तेत सहभागी शिवसेनेच्या हल्ल्यांनाही सामोरे जावे लागणार आहे.  

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या २५ ते ३० टक्केच शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. पीक कर्ज उपलब्ध झालेले नाही. पीक कर्जाच्या नावावर शेतकरी महिलांची लैंगिक प्रताडणा होत आहे. महिलांवरील अत्याचार वाढले असून शिक्षेचे प्रमाण कमी आहे. नागपूरसह राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. अफवांच्या माध्यमातून मोठ्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांना गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात राजाश्रय मिळत आहे. संभाजीनगरातील दंगल संदर्भात आवाज उचलण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनलाही त्यांनी विरोध दर्शविला.    

नाणार नाही म्हणजे नाहीच
मुख्यमंत्री काहीही बोलत असले तरी शिवसेनेचा नाणार प्रकल्पास विरोध असून तो होऊ देणार नाही, असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला.

महाराष्ट्र बॅंकेसारखा निर्णय लावा
महाराष्ट्र बॅंकेच्या संचालकांवर करण्यात आलेल्या कारवाईप्रमाणे सर्वांवर कारवाई करण्याची मागणी गोऱ्हे यांनी केली. 

Web Title: Monsoon Session Shivsena BJP Politics