आठवडाभरात मॉन्सून धडकणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

वेधशाळेचे संकेत; ६ जूनपर्यंत राज्यभरात पाऊस

अकोला - गेल्यावर्षी झालेले मॉन्सूनचे आगमन व सरासरी पर्जन्यमानातून अकोलेकरांची घोर निराशा झाली. त्यामुळे खरिपात सरासरी ६०, तर रब्बीचे ५० टक्के उत्पादन घटले. एवढेच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे जलाशये कोरडे पडले, कुपनलीका आटल्या, विहिरी, हातपंपालाही पाणी नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, यंदा ६ ते ८ जूनपर्यंत मॉन्सून वऱ्हाडात धडकणार असल्याचे वेधशाळेचे संकेत सर्वांना आनंदाने चिंब करणारे ठरणार आहेत.

यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस
गतवर्षी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अपेक्षीत ६९७.३० मिमी एेवजी ६९.९७ मिमी ने पर्जन्यमान घटून ५५०.९७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सरासरी २०.९६ टक्क्यांनी पर्जन्यमान घटले होते. यंदा मात्र ९६ टक्के म्हणजे ६५५ मिमी पाऊस पडणार असल्याचे संकेत वेधशाळेकडून देण्यात आले आहेत. शिवाय यंदा लोकसहभाग व प्रशासनाने पुढाकार घेऊन, जलसंवर्धन व पुनर्भरण कार्यक्रामासाठी पुढाकार दर्शविल्याने, शेतीसाठी सुगिचे दिवस येण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान, सकाळ व दुपारची आद्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारीत अंदाजानुसार ५ ते ६ जूनदरम्यान राज्यभरात मॉन्सूनचे जोरदार आगमन होईल. अकोला जिल्हा तसेच वऱ्हाडातही पहिल्या आठवडातच मॉन्सून धडकण्याची शक्यता आहे.
- रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, पुणे.

तरी पेरणीची घाई नको
आठवडाभरात मॉन्सूनच्या सरी कोसळणार असल्याचे संकेत आहेत. परंतु, दरवर्षीचा पावसाच्या लहरिपणाचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पहिल्या पावसासोबतच पेरणीची घाई करू नये. १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणीला सुरवात करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Web Title: Monsoon strikes in the week